Breaking-newsताज्या घडामोडी
‘पुन्हा येणार’असं म्हणणारे पुन्हा आलेच नाहीत; अब्दुल सत्तार यांचा फडणवीसांना टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/16-3.jpg)
धुळे |महाईन्यूज|
जे म्हणत होते आम्ही पुन्हा येऊ ते तर परत आलेच नाहीत, असा टोला धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
राज्य सरकारच्या घोषणेनंतर धुळ्यात शिवभोजन थाळीचा सत्तार यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला येवेळी ते बोलत होते. धुळे बसस्थानक परिसरात प्रायोगिक तत्त्वावर ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. शिवभोजन थाळीच्या जेवणाचा दर्जा अतिशय चांगला असल्याचेही सत्तार यांनी यावेळी नमूद केले.