नीट 13 सप्टेंबरलाच होणार, सर्वोच्च न्यायालयाने नव्या याचिका फेटाळल्या
नवी दिल्ली – येत्या रविवारी, 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET (एनईईटी) पुढे ढकलण्याची मागणी करणार्या तीन नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावल्या.
येत्या रविवारी, 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET (एनईईटी) पुढे ढकलण्याची मागणी करणार्या तीन नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावल्या.
न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांच्या खंडपीठासमोर तीन याचिकांवर विचार केला जाणार होता. परीक्षा रद्द करण्याचा नव्हे तर केवळ स्थगितीसाठी याचिकाकर्त्यांनी जोर दिला होता.
17 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नीट 2020 आणि जेईई पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. “विद्यार्थ्यांची कारकीर्द दीर्घ काळासाठी संकटात टाकू शकत नाही”, असे म्हटले होते.





