निर्भया प्रकरण: सुनावणीतून सरन्यायाधीश झाले बाजूला, पुनर्विचार याचिकेवर उद्या होणार सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/sharad-bobade-Frame-copy.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
सात वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता या याचिकेवरील सुनावणी बुधवारी होणार आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीसाठी नवे घटनापीठ बुधवारी सकाळीच स्थापन केले जाईल. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पुतण्याने निर्भयाच्या बाजूने युक्तिवाद केला असल्याने सरन्यायाधीश शरद बोबडे हे या सुनावणीपासून वेगळे झालेले आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. पैकी अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दयेची याचिका दाखल केली आहे. दरम्यान या सुनावणीवेळी निर्भयाचे पालकसुद्धा न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, दोषीच्या वकिलाला युक्तिवादासाठी ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यावेळी दोषींच्या वकिलाने आपल्या अशिलाविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा करत सगळा दोष प्रसारमाध्यमांच्या माथी मारला. प्रसारमाध्यमांनीच आपल्या अशिलाविरोधात अपप्रचार केला. असा आरोप त्यांनी केलेला आहे.