Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २४ तासांत तब्बल ८६ हजार ४३२ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – देशात कोरोनाची चिंता वाढत जात असून गेल्या २४ तासांत तब्बल ८६ हजार ४३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या हजारांनी वाढत असल्याने येत्या काही दिवसांत रोजच्या नव्या रुग्णसंख्येत लाख रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत १ हजार ०८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या देशात एकूण ४० लाख २३ हजार १७९ रुग्ण आहेत. तर, ८ लाख ४६ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ३१ लाख ७ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६९ हजार ५६१ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button