देशात २४ तासांत तब्बल ८३,८८३ नवे रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Corona-test-hero-a219365.jpg)
- भारताने ३८ लाखांचा टप्पा पार केला
नवी दिल्ली – कोरोना संकटापुढे शेकडो देश हतबल झाले असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे, तर आठ लाखांहून अधिक जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच दुसरीकडे आपल्या भारतात दररोज धडकी भरविणारी नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर येत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 83 हजार 883 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाख 53 हजार 407 वर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत देशात 1 हजार 43 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील कोरोनाबळींचा आकडा 67 हजार 376 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 29 लाख 70 हजार 493 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर सध्या 8 लाख 15 हजार 538 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिका-ब्राझीलमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. मात्र गेल्या 24 तासांत अमेरिकेत 40 हजार 899 तर, ब्राझीलमध्ये 48 हजार 632 रुग्ण आढळले. हा आकडा भारतापेक्षा कमी आहे.