breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २४ तासांत तब्बल ५५ हजार ७९ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – भारतात मागील २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. देशात २४ तासांत तब्बल ५५ हजार ७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १६ लाख ३८ हजार ८७१ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत ७७९ रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा ३५ हजार ७४७ इतका झाला आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत १० लाख ५७ हजार ८०६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ५ लाख ४५ हजार ३१८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. चिंताजनक बाब म्हणजे देशात सर्वाधिक कोरोनाबळी आणि कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून राज्यात मुंबई आणि पुण्याची परिस्थिती गंभीर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button