देशात गेल्या 24 तासात 48,268 जणांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली – देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला असला तरी, कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. देशात आज 48 हजार 268 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 81 लाखांच्या पार गेला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 74 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 48 हजार 268 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 551 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 81 लाख 37 हजार 119 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 5 लाख 82 हजार 649 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत 1 लाख 21 हजार 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 74 लाख 32 हजार 829 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.





