breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,01,46,846 वर

  • 24 तासांत 23,068 नवे रुग्ण

नवी दिल्ली – देशात आज सलग बाराव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 30 हजारांपेक्षा कमी आहे. मात्र एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. देशात मागील 24 तासांत 23,068 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 336 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,01,46,846 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,47,092 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 24,661 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 97,17,834 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 2,81,919 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

वाचा :-Earthquake in Delhi: दिल्लीत पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये घबराट

वाचा :-Christmas: देशभरात नाताळाचा उत्साह; राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button