तेलंगाना राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/trains.gif)
मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान देशातील विविध राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना त्यांच्या घरी पोहोचविण्यााठी ट्रेन सोडण्याची विनंती तेलंगाणा राज्याने केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेप्रशासनाने एक विशेष गाडी सोडण्याचे ठरवले होते. तेलंगणच्या लिंगमपल्ली येथून झारखंड राज्यातील हटियासाठी पहिली ट्रेन रवाना झाली. ही ट्रेन आज पहाटे वाजून ५० मिनिटांनी सुटली. २४ डबे असलेली ही ट्रेन आज (१ मे)रात्री ११ वाजता झारखंडच्या हटिया येथे पोहोचेली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणहून झारखंडला रवाना झालेली ही ट्रेन नॉनस्टॉप ट्रेन असणार आहे, असे आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले. या ट्रेनमध्ये एकूण १२०० प्रवासी असून ती रात्री १२ वाजता हटिया येथे पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली. देशात कोरोनाचा संसर्ग पाहाता रेल्वे प्रशासनान मालगाडी वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत.
या ट्रेनमध्ये स्थलांतरित मंजुरांच्या चाचण्याची तयारी झारखंड सरकारने केली असून त्याप्रमाणे ट्रेनमधून प्रवास केलेल्या मंजुरांना क्वारंटीन ठेवण्यासाठीची तयारी करण्यात आल्याचे झारखंडमधील संबंधित शासकीय अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.