Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
जालन्यात एका 32 वर्षीय होमगार्डला कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 86 वर
जालना | जालन्यात एका होमगार्डला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या ही 86 वर जाऊन पोहोचली आहे. जालना जिल्हा रुग्णालयाने मंगळवारी सायंकाळी प्रयोग शाळेकडे संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान, मंठा चौफुलीजवळ असलेल्या एका खाजगी रुग्णालयातील काही संशयित आणि अन्य काही जणांचा समावेश होता.
राज्य राखीव दल आणि उपरोक्त भागातील खाजगी रुग्णालयातील मिळून 87 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर जालन्यातील एका 32 वर्षीय होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन ती 86 वर पोहचली आहे. जिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत 24 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तर 62 कोरोना रुग्णांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





