गुप्तचर यंत्रणेचा ‘हाय अलर्ट’; 11 मे रोजी होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/army-nsg.jpg)
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडे कोरोनाविरुद्ध महासंकटाचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या कुरघोड्यांनाही भारतीय सैन्य दल चोख प्रत्युत्तर देत आहे. मागच्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. तर राजौरी, कुपवाड, पूंछ इथे कुरघोडी करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी चोख प्रत्यतर दिलं आहे. या कुरापती सुरु असतानाच आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
केंद्रशासित प्रदेशाच्या Intelligence Alert ला मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ले घडवून आणले जाणार आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने 11 मे रोजी एकाच वेळी हे हल्ले घडवून आणण्याची योजना आखल्याची माहिती मिळाली आहे. ‘एका इंग्रजी’वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ले घडवून आणण्याची योजना आखली जात आहे. यामध्ये भारतीय सैन्य आणि निमलष्करी तळाला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी दहशतवादीविरोधी मोहिमेशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रावळपिंडी इथे मुफ्ती अब्दुल रउफ असगरची ISI अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार होती. 11 मे रोजी काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याच्या योजनेमध्ये मुफ्ती अब्दुल रउफ असगरचाही हात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिऴाली आहे.