कोरोना व्हायरसचा पोल्ट्री उद्योगाला फटका,सोशल मीडियावर पसरलेली चुकीची माहिती कारणीभूत

करोना व्हायरसच्या संकटामुळे सगळं जग हादरलं आहे. अशात सोशल मीडिया वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या अशास्त्रीय माहितीमुळे चिकन आणि इतर कुक्कुट उत्पादनांच्या सेवनावर परिणाम झाला आहे. हा रोग चिकन आणि कोंबड्यांच्या उत्पादनांमधून पसर असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावरुन प्रसारित होते आहे. या माहितीचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे.

महाराष्ट्रात हा उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र करोनाचा परिणाम झाल्याने एक महिन्याच्या कालावधीत पोल्ट्री उद्योगातील विक्री १२०० मेट्रिक टन इतकी उतरली आहे. त्याचबरोबर मागणी उतरल्याने दरामध्ये घसरण सुद्धा लक्षणीय आहे.
महाराष्ट्र हे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशातील काही अग्रेसर राज्यांपैकी एक आहे. सन २०१९ च्या विसाव्या पशू गणनेनुसार राज्यांमध्ये एकूण कुकुट संख्या सात कोटी ४२ लाख इतकी आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात वाढवण्यात येणाऱ्या अंड्यावरील व माणसाला पक्ष्यांची संख्या पाच कोटी ६ लाख इतकी असून परसातील कुक्कुट पक्ष्यांची संख्या २ कोटी २१ लाख एवढी आढळून आली आहे करोना व्हायरस बाबतची चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे अंडी आणि चिकन मागणी कमी झाली असून त्याचा परिणाम किमतीवर देखील झाला आहे.





