केंद्रातील सरकार देशाची अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीवर व्यापकपणे बोलताना दिसत नाही- खासदार सुप्रिया सुळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Eh2l.png)
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे योग्य ती काळजी घेऊन आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झालेले आहे. या अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका करायला सुरुवात केलेली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार देशातील अर्थव्यवस्था वा बेरोजगारी बाबतीत व्यापकपणे बोलत नसल्याने ते याबाबत गंभीर नसल्याचे आरोप केलेले आहेत. संसदेचे कामकाज सुरु झाल्यावर लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलेले आहे.
‘आपल्या देशात जे गंभीर संकट आले आहे, हे जागतिक संकट असल्यामुळे त्यातून जाणारा केवळ आपला एकमेव देश आहे असे नाही. पण सरकारने जितके अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीतील आव्हानांबाबत सविस्तररित्या बोलले पाहिजे तितके बोलताना दिसत नसल्याचे’ सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे सरकारने या गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन यास प्राधान्य दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितलेले आहे.