काहीतरी गडबड आहे, शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी
नवी दिल्ली | दिल्लीतील शाहिन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकाना तेथून हटविण्यात यावे, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सविस्तर सुनावणी घेण्यात येणार आहे. काहीतरी गडबड आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या ठिकाणाबद्दल मांडले.
या प्रकरणात अमित साहनी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्या. संजय कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने येत्या सोमवारी, १० फेब्रुवारीला सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. दिल्लीमध्ये उद्या, शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे.
हा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडला. त्यावर न्यायालयाने म्हटले की, त्यामुळेच आम्ही सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तिथे काहीतरी गडबड निश्चित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.