Breaking-newsआंतरराष्ट्रीय

बांगलादेशात महिला पत्रकाराची हत्या

ढाका – बांगलादेशातील एका दूरचित्रवाणीवाहिनीच्या महिला पत्रकाराची भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. सुवर्णा नोदी असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती 32 वर्षीय होती. तिला नऊ वर्ष वयाची एक मुलगी आहे. ही महिला आनंदा टीव्ही साठी काम करीत होती तसेच जाग्रोतो बांगला या वृत्तपत्राची प्रतिनिधी म्हणूनही ती कार्यरत होती.

बांगलादेशाच्या पबना जिल्हतील राधानगर भागात ती राहात होती. काल रात्री दहा ते बारा जणांचा एक गट तिच्या घरी आला. त्यांनी बेल वाजवून त्यांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले त्यानंतर त्यांनी तिच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर मारेकरी पळून गेले. स्थानिक नागरीकांनी त्यांनी रूग्णालयात दाखल केले परंतु उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. हल्ल्याचा हेतू अजून समजला नाही. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सर्वत्र पथके पाठवण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button