Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या पुन्हा कुरापती; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर: भारती-चीन लडाखमध्ये तणावपूर्ण वातावरण असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर काश्मीरमधील सोपोर भागातील हरदशिवा गावात गुरुवारी सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे.

या गावात काही दहशतवादी घरांमध्ये लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यासाठी परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलानं संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. या गोळीबाराला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button