Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
ऑक्सफोर्डमध्ये कोरोना संसर्गावरील लसीवर यशस्वी संशोधन
नवी दिल्ली | कोविड-19 च्या लसीच्या प्राथमिक टप्प्यात मानवी चाचण्यांनंतर प्राणघातक कोरोनाव्हायरसपासून “दुहेरी संरक्षण” मिळण्याची शक्यता आहे. तसे परिणाम चाचण्यांतून दिसून आले आहेत. हे निष्कर्ष सोमवारी जाहीर केले जातील, असा अंदाज आहे. तरीही त्याबद्दलची माहिती मात्र प्रसारमाध्यमात आलेली आहे.
यूकेच्या स्वयंसेवकांच्या गटाकडून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमधून ही लस शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आणि “किलर टी-सेल्स” तयार करण्यास मदत करते. या चाचणीतील एका ज्येष्ठ सदस्याने ‘द डेली टेलीग्राफ’ला ही माहिती दिली आहे.