उद्या सकाळी 9 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार !
नवी दिल्ली | देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. अशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. पण यावेळी ते एका नव्या वेळेत देशाशी संवाद साधणार आहे. नोटबंदी असो वा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी हे नेहमी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करायचे. पण यावेळी ते सकाळी 9 वाजता देशातील नागरिकांना खास मेसेज देणार आहे.उद्या म्हणजेच शुक्रवारी 9 वाजता सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यासंबंधी ट्वीट करत मोदींनी माहिती दिली आहे. मोदी यावेळी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या या धोक्यापासून वाचण्यासाठी मोदी वारंवार जनतेशी बोलत आहेत. काही दिवसांआधी त्यांनी फोनद्वारे मन की बात हा कार्यक्रमदेखील केला होता.





