Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

‘I am Possible’; शरद पवारंबद्दल अमृता फडणवीस काय म्हणाल्या वाचा

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांनी देखील शुभेच्छा देत पवारांचे कौतुकच केले आहे. महाविकासाआघाडीवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या शुभेच्छेने सर्वांनाच आचंबित केले आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांच्याकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो. त्यांच्याकडे नेहमीच ‘आय एम पॉसिबल’ हा शब्द असतो. हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.

“शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह देशासाठी खूप काम केलं आहे. त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. शरद पवारांकडे इम्पॉसिबल हा शब्द नसतो. त्यांच्याकडे नेहमी शब्द असतो, आय एम पॉसिबल. हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. कितीही खाली गेलो तरी वर उसळून यायची हिंमत आणि इच्छा असायला पाहिजे. त्यासाठी वय, जात याचा काहीही संबंध नसतो,” अश्या शब्दांत अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button