Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आजपासून सिलेंडर डिलिव्हरीचे नवे नियम लागू

नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून सिलेंडरच्या बुकिंग आणि डिलिव्हरी पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सिलेंडरची होणारी चोरी रोखण्यासाठी आणि ग्राहकांची योग्य ओळख पटवण्यासाठी एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरीचे नियम बदलण्यात आले आहेत. बदलण्यात आलेल्या नव्या नियमांना DAC असं नव देण्यात आले आहे. आता ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येणार आहे. तो ओटीपी डिलिवव्हरी बॉयला दिल्यानंतर आता तुम्हाला सिलेंडर देणार येईल.

ग्रहकाने डिलिव्हरी बॉयकडे त्याचा मोबाईलनंबर अपडेट केला नसेल तर गस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडे असलेल्या ऍपच्या मदतीने रियल टाईम नंबर अपडेट करता येईल. त्यानंतर कोड जनरेट करता येवू शकेल. सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीचे नवे नियम १०० स्मार्ट सिटीमध्ये लागू करण्यात आले आहेत.

त्यानंतर आता हळूहळू सर्वच शहरांमध्ये हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. प्रायोगित तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या यंत्रणेला ९५ टक्क्यांपेक्षा अधिक यश मिळालं आहे. ही योजना फक्त घरगुती वापराच्या सिलेंडर करता लागू करण्यात आली आहे.

जर तुम्ही इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्हाला बुकिंसाठी नव्या क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. कारण इंडेनने त्यांचा अधिकृत क्रमांक बदलला आहे. आता ग्राहकांनी एलपीजी बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर SMS पाठवावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button