Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गर्भवती हत्तीण हत्या प्रकरण : केरळ वन विभागाची कारवाई

तिरुअनंतपुरम | केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच हत्तीणीला फटाकांनी भरलेलं फळं खायला दिलेल्या आरोपींविरोधातही संताप व्यक्त केला जात होता. अशातच या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती शेतात काम करते. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.

केरळमधील मलप्पुरमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. एका भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने मृत्यू झाला होता. या फटाक्यांच्या स्फोटानंतर या हत्तीणीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे हत्तीणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली होती. या अमानवीय घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.

एका वन अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टनंतर हा सगळा प्रकार उजेडात आला. या वन अधिकाऱ्यांच्या फेसबूक पोस्टनंतर सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या अटकेची मागणी आता केली जात होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेरीस केरळ सरकारने पावलं उचलत पोलीस आणि वन-विभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखलं. सरकारी यंत्रणांच्या या प्रयत्नांना अखेरीस यश येताना दिसत आहे. केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button