breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 चॅम्पियन

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने इतिहास रचला आहे. केकेआरने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सनरायजर्स हैदराबादने केकेआरसमोर 114 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान सहज पार केलं. केकेआरने 10.3 ओव्हरमध्ये विकेट्स गमावून 114 धावा केल्या. केकेआरची ही आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी तर 2012 नंतर चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अंतिम सामना जिंकण्याची दुसरी वेळ ठरली. केकेआरने याआधी 2012 साली पहिल्यांदा चेन्नईला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

केकेआरकडून सुनील नरीन आणि रहमानुल्लाह गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात आली. केकेआरने पहिली विकेट झटपट गमावली. केकेआरच्या 11 धावा असताना नरीन 6 धावांवर आऊट झाला. त्यानंतर गुरुबाज आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यानंतर रहमानुल्लाह गुरुबाज 32 चेंडूत 39 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या जोडीने केकेआरला विजयापर्यंत पोहचवलं. वेंकटेशने 26 बॉलमध्ये 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर श्रेयस 6 धावांवर नाबाद परतला. हैदराबादकडून कॅप्टन पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

हेही वाचा – अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका

दरम्यान त्याआधी सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादचा निर्णय चुकीचा ठरवला. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर गुंडाळलं. हैदराबादकडून पॅट कमिन्स याने 24, एडन मारक्रम 20, हेन्रिक क्लासेन 16 आणि नितीश रेड्डीने 13 धावांच योगदान दिलं. तर केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा जोडीने 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी आणि मिचेल स्टार्क या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button