पिंपरी / चिंचवड

अपहरण आणि मारहाण प्रकरण मामाची तीन मुले आणि मामी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

मामी आणि मामाच्या तीन मुलांनी मिळून भाच्याचे अपहरण करून खोलीत डांबून ठेवले. मारहाण करून मामीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 1 मे रोजी मध्यरात्री एक ते पहाटे साडेचार वाजताच्या कालावधीत पिंपरी आणि शिवमांजरी पुणे येथे घडली.

अजीमलंग नाबिसाब शेख मुल्ला (वय 39, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खालिद इब्राहीम ह्सेख, इस्माईल इब्राहीम शेख, जैनोद्दिन इब्राहीम शेख, रोषणबी इब्राहीम शेख (सर्व रा. शिवमांजरी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी येऊन ‘तू आमच्या घरात चोरी केली आहे’ असे म्हणून लोखंडी रॉडने मारहाण केली. बळजबरीने रिक्षात बसवून शिवमांजरी येथे नेले. घरात बंद केले. मामी रोषणबी हिने ‘याला आज जिवंत सोडायचे नाही’ असे धमकावून हाताने मारहाण केली. मामाच्या तिन्ही मुले आरोपींनी फिर्यादीस लोखंडी रॉड आणि हाताने मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button