breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘कुपोषित’ म्हणून हिणवणाऱ्यांची केतकिने घेतली शाळा; पोस्ट व्हायरल..

Ketaki Mategaonkar : सोशल मीडिया वरती कलाकारांना ट्रोल केलं जाणं हे सध्या सुरू आहे. अश्यातच मराठी सिनेसृष्टीतली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावरला बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं. केतकीच्या फोटो आणि व्हिडिओंच्या खाली कमेंट करत तिच्या वजनावरून कमेंट करत तिला ट्रोल केलं जात आहे. यावर कधीही न बोलणारी केतकी आता मात्र व्यक्त झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना करणाऱ्यांना तिनं चांगलंच सुनावलं आहे.

केतकीन इंस्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय लिहलं?

किती बारिक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारिक होतास, आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिसमधले सहकर्मचारी असो, कोणीही असो. आपल्याला नेहमी या अशा वाक्यांना सामोरं जावं लागतं.

मी एवढं म्हणेन, या सगळ्यात मी तुमच्यासोबत आहे. अशा गोष्टींशी माझाही संबंध आला आहे. पण तुमच्या शरीराबद्दल तुम्ही अभिमान बाळगा. तुम्ही सुंदर आणि अनोखं आहात. तुमच्यातील अनोखेपणाची किंमत करा. कारण ती देवाची देण आहे. जर एखादा डॉक्टर, आहारतज्ज्ञ किंवा कोणीही पात्र असलेली व्यक्ती किंवा तुमच्याबद्दल ज्यांना खरीच काळजी असणारे मित्र, पालक यांचंच ऐका. पण एखादी व्यक्ती जर तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी काही म्हणत असेल किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल वाईट वाटेल असं काही म्हणत असेल तर त्यांचं अजिबात ऐकू नका.

हेही वाचा  –  ‘२०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील’; भाजप नेत्याचं विधान 

https://www.instagram.com/p/C0YewxLyphb/?img_index=1

प्रिय ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत स्किनी (बारिक), हाडांचा सापळा, बारिक आहे. हो आहे आणि तरीसुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारिक.. तशी मी सुद्धा आहे बारिक. तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असले. पण म्हणून मी निरोगी नाही का? तर अजिबात नाही. व्यायाम किंवा जिम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीक आहे. पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्ट्सवर खुलेपणाने कमेंट करणं याला तुम्ही स्वातंत्र्य आणि फ्री स्पीच असं नाव देता.

आम्हाला या ट्रोलिंगची आता सवय झाली आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या, प्रोत्साहित करणाऱ्या त्या १०० आणि १००० सुंदर लोकांच्या तुलनेत तुम्ही फार कमी आहात. आम्ही कलाकारसुद्धा माणसं आहोत. ठेच लागली तर आम्हालाही रक्त येतं, आम्हालाही वेदना होतात. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील, आई असेल. याचा विचार करा. काही लोकं असेही असतील ज्यांना खरंच मेडिकल समस्या असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल. अशा लोकांना तुम्ही किती भयंकर मानसिक स्थितीत ढकलत आहात, याचा जरा विचार करा. थोडं प्रेमळ आणि दयाळूपणे वागा. थोडी सहानुभूती आणि करुणा दाखवा.

माझ्या सर्व प्रेमळ आणि सर्वांत मौल्यवान चाहत्यांनी मी सांगू इच्छिते, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि प्रामाणिकतेसाठी मी तुमचे आभार मानते. मी जशी आहे, तसा तुम्ही माझा स्वीकार केलात. तुम्ही मला समजून घेतलात. तुमच्या सकारात्मकतेच्या संदेशाने मला प्रोत्साहन दिलं आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, असं काही घडतं तेव्हा सर्वांत आधी तुम्ही तुमच्या पोस्टने आणि मेसेजने माझ्या चेहऱ्यावर हसू आणता. मी तुमचे मेसेज, कमेंट्स वाचत असते आणि तुमच्याकडून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल मी खूप ऋणी आहे. मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन, असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button