breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

नवा झेंडा ; राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपला ध्वज बदलला आहे. मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.

या नव्या झेंड्याबरोबरच मनसे आगामी काळात आपल्या राजकारणाची दिशाही बदलणार आहे. आता मनसे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राजकारण करेल. अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची मांडलेली तसबीर याचेच संकेत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button