breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या या दोन बड्या नेत्यांचा मोदींच्या उपस्थितीत होणार प्रवेश

पुणे – राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अहमदनगर येथे होत आहे. या सभेत विखे पाटील भाजपात जाहीर प्रवेश करतील. तर, माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ १७ एप्रिल रोजी मोदींची अकलूज येथे सभा होत असून या सभेत विजयदादा भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळते.

राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी मागील महिन्यात भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना अहमदनगरमधून तिकीट दिले होते. यानंतरच्या काळात वडील राधाकृष्ण विखे हे मुलगा सुजयचा उघडपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे ते भाजपात लवकरच जातील अशी चर्चा सुरू होती. एका वाहिनीला मुलाखत देताना लवकरच राजकीय भूकंप घडवू असे संकेत दिले होते. त्यामुळे विखेंचा भाजप प्रवेश नक्की होता मात्र तो कधी होणार याचीच उत्सुकता होती. मात्र, विखेंच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला असून, येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील.

सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आठच दिवसात राष्ट्रवादीचे बडे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी विजयदादांनी भाजपात जाण्याचे टाळले होते. मात्र, मुलगा रणजितसिंह यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले होते.

दरम्यान, मुलगा रणजितसिंह यांच्याऐवजी फलटणच्या निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली तरी भाजपच्या विजयासाठी मोहिते पाटील मेहनत घेत आहेत. सुरूवातीला मी राष्ट्रवादीतच आहे असे स्पष्ट करणारे विजयदादा आता निर्णायक स्थितीत पोहचल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या १७ एप्रिल रोजी अकलूजमध्ये निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. या सभेत विजयदादा भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळते.

भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे यांना राज्यात मलईदार कॅबिनेट मंत्री देणार असल्याचे समजते तर विजयसिंह मोहिते पाटलांना राज्यपालपद देण्याचे सुतोवाच मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button