breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

इथे न्याय मिळतोच : आमदार लांडगे समर्थक विजय फुगे ‘डीपीडीसी’वर!

पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती

जिल्ह्यातील दिग्गज राजकीय व्यक्तींच्या रांगेत स्थान

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी भोसरीतील विजय फुगे यांनी नियुक्ती करण्यात आली. आमदार महेश लांडगे यांचे २०१४ पासून कट्टर समर्थक आणि सक्रीय नेते म्हणून फुगे यांची ओळख आहे. त्यांच्या निष्ठेला न्याय मिळाल्यामुळे भोसरीतील लांडे, लांडगे, फुगे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांच्यासोबत निष्ठा ठेवलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोच…अशी चर्चा लांडगे समर्थकांमध्ये सुरू झाली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे तत्कालीन प्रचारप्रमुख आणि शिवसेना उपशहरप्रमुख म्हणून राजकीयदृष्टया सक्रीय होते. २०१४ मध्ये आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली. त्यावेळीपासून फुगे यांनी लांडगे यांच्या समर्थनात काम सुरू केले. आमदार लांडगे यांच्या २०१४ च्या विजयात  ‘नारळ’ ग्रुपचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या ग्रुपमधील प्रत्येक गावनिहाय नेत्यांची मोट बांधण्यात विजय फुगे यांचा हातभार होता. 

वास्तविक, विजय फुगे यांना २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत तिकीटाची अपेक्षा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अन्य उमेदवाराला प्राधान्य दिले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपा स्वीकृत सदस्य संख्या (कोटा) कमी झाला आणि फुगे यांची संधी हुकली होती. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांनी निवड करण्यात आली. लांडगे यांनी आपल्या पहिल्याच कार्यकारिणीमध्ये विजय फुगे यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. पक्ष संघटनात्मक कार्यात फुगे यांनी कामाचा ठसा उमटवला. 

दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर अडीच-तीन वर्षे शहरातील राजकीय वर्तुळात अनेक हालचाली सुरू झाल्या. भाजपा पक्षांतर्गत फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, विजय फुगे यांना महाविकास आघाडीत प्रवेश करण्याबाबत विचारणाही करण्यात आली. मात्र, फुगे यांनी आपण आमदार लांडगे यांच्यासोबत काम करणार असल्याची भूमिका कायम ठेवली. या निष्ठेचे फळ अखेर फुगे यांना मिळाले. 

दिग्गजांच्या रांगेत स्थान मिळाले…

जिल्हा नियोजन समितीनध्ये शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, माजी आमदार योगेश टिळेकर अशा दिग्गज राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. भाजपाचे शहर सरचिटणीस असलेल्या विजय फुगे यांना या दिग्गजांच्या रांगेत बसण्याची संधी मिळाली आहे. या नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यामुळे विजय फुगे यांचे राजकीय वजन वाढले आहे. तसेच, फुगेंचा भोसरी गावासह पंचक्रोशीत गोतावळा मोठा आहे. लांडे, लांडगे, फुगे यांच्यासह स्थानिक आप्तेष्ठांमध्ये  या नियुक्तीने समाधानाचे वातावरण आहे. 

शिरुर लोकसभा मतदार संघावर भाजपाची नजर…

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदार संघावर ‘फोकस’ केले आहे. निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ आणि समन्वयक धर्मेद्र खांडरे यांच्यासोबतीने आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून पिंपरी-चिंचवड सरचिटणीस विजय फुगे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यांच्या नियोजन आणि संघटनात्मक कार्यक्रमात विजय फुगे सक्रीय दिसले. या मतदार संघातील गाव-खेड्यांपर्यंतचा अभ्यास फुगेंना आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्यपदी संधी देत भाजपाकडून शिरुर मतदार संघातील पकड मजबूत करण्यावर भर दिल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button