breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

JNU ATTACK: पोलिसांनी सुरू केली चौकशी, पुरावे घेतले

नवी दिल्ली | महाईन्यूज

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) झालेल्या हिंसाचाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून चेहरे झाकून आलेल्या गुंडांना शोधण्यासाठी गुन्हा शाखा व स्थानिक पोलिसांच्या तुकड्या सक्रिय झाल्या आहेत. मात्र दोन दिवसांनंतरही कोणालाही अटक झालेली नाही. दिल्ली पोलिसांनी ही चौकशी संयुक्त पोलीस आयुक्त शालिनी सिंह यांच्याकडे दिल्यावर त्या मंगळवारी आपल्या टीमसोबत विद्यापीठात गेल्या होत्या. त्या हिंसाचार झालेल्या सगळ््या जागी जाऊन विद्यार्थ्यांशी बोलल्या आहेत. त्यांनी सिंह यांना महत्वाची माहिती दिली आहे. फॉरेन्सिक टीमनेही हिंसाचार झालेल्या जागांवरील पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे हल्लेखोरांना पकडण्यास मदत मिळणार आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, समाज माध्यमांवर पसरवले जात होते त्या व्हॉट्सअ‍ॅपच्या स्क्रीनशॉट्सची चौकशी मोबाईल नंबरसह केली जात आहे. त्यातील बरेच नंबर्स स्वीचड्आॅफ आहेत. परंतु, त्या नंबर्सचे ठिकाण हिंसाचाराच्या वेळी कोणते होते याची चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी पोलीस व्हिडियो फुटेज, चेहरे ओळखणा-या प्रणालीचा उपयोग करीत आहेत. १०० पेक्षा जास्त कॅमेऱ्यांतील व्हिडियोज ताब्यात घेण्यात आलेले आहेत. शालिनी सिंह पोलीस वर्तुळात मॅडम ट्रेस आॅफ ब्लार्इंड केस या नावाने प्रसिद्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button