JNU Attack: दिपिका पादुकोणच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा
नवी दिल्ली | महाईन्यूज
जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दिपिका पादुकोणने जेएनयू गाठले होते. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून #boycottchhapaak या माध्यमातून ट्रोलिंग करण्यात येत आहे. यावरुन भाजपाने आमचा याच्याशी काहीही संबंध नाही सांगत हात झटकलेले आहेत. दिपिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे आम्ही तिच्या सिनेमाला बॉयकॉट करत नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
भाजपा नेत्यांच्या या विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की, स्वतंत्र्य भारतातील नागरिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र कलाकारांनाच नाही तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा आहे. आम्ही त्यांच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं समर्थन करत नाही कारण ते आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं त्यांनी सांगितलेले आहे.