breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#JNU: जेएनयूतल्या रोडचं नामकरण केलं सावरकर मार्ग; विद्यार्थिनी म्हणे, युनिव्हर्सिटीत त्यांना जागा नाही

नवी दिल्ली | महाईन्यूज

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU Campus)च्या रस्त्याचं नाव बदलण्यात आलं आहे. JNUतल्या या रोडचं नाव आता विनायक दामोदर सावरकर रोड करण्यात आलं आहे. सावरकर हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात. जेएनयू छात्रसंघाची अध्यक्षा आयशी घोषनं याचा निषेध नोंदवला आहे. जेएनयू कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला या रस्त्याचं नाव वी. डी. सावरकर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचदरम्यान हॉस्टेलमधल्या फीवाढीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

जेएनयू रोडला गुरु रविदास मार्ग, राणी अब्बाका मार्ग, अब्दुल हामिद मार्ग, महर्षि वाल्मिकी मार्ग, राणी झांसी मार्ग, वीर शिवाजी मार्ग, महाराणा प्रताप मार्ग आणि सरदार पटेल मार्ग अशा नावांचाही पर्याय देण्यात आला होता. या सर्व नावांवर विचारविनिमय केल्यानंतर जेएनयू कार्यकारी परिषदेनं वी. डी. सावरकर मार्गाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. जेएनयू छात्रसंघाच्या अध्यक्ष आयशी घोष हिनं रस्त्याचं नाव सावरकर मार्ग ठेवण्याला लाजिरवाणी घटना म्हटलं आहे. आयशीनं ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुबनसीर हॉस्टेलला जाणाऱ्या रस्त्याला वी. डी. सावरकर मार्ग नाव देण्यात आलं आहे.

आयशी घोषनं ट्विट करत म्हटलं आहे की, जेएनयू विश्वविद्यालयाच्या रस्त्याला एका व्यक्तीचं नाव देण्यात आलं आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांना विश्वविद्यालयाच्या जवळपास कधीही जागा नव्हती आणि भविष्यातही नसेल. या प्रकरणात जेएनयू रजिस्ट्रारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, असंही आयशी घोष हिनं सांगितलं आहे. गेल्या वर्षी दिल्ली युनिव्हर्सिटीत विनायक दामोदर सावरकरांची मूर्ती लावण्यावरूनही गोंधळ झाला होता. तत्कालीन छात्रसंघाचे अध्यक्ष शक्ति सिंह यांनी कोणतीही परवानगी न घेता कॅम्पसमधल्या गेटवर वी. डी. सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंह यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. त्यानंतर छात्र संघटनेनं यावर आक्षेप घेतला. काही जणांनी सावरकर यांच्या प्रतिमेला काळी शाही फासली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्यानंतर ती प्रतिमा तिथून हटवण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button