breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचे अड्डे उद्ध्वस्त

कराड |

खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेकायदेशीर वाळू उपसा व गौण खनिज उत्खननाचे अड्डे उद्ध्वस्त करून एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकी, वाळूसाठा हस्तगत केला आहे. शासकीय चारचाकी वाहनाची चाहूल लागताच वाळू माफिया धूम ठोकतात म्हणून त्यांना बेसावध ठेवण्यासाठी तहसीलदार जमदाडेंनी मोटार सायकलवरून जात वाळू माफियांची पोलखोल केली. खटाव तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध बेसुमार वाळू उपसा व गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार जमदाडे यांना मिळाली. त्यानुसार जमदाडे यांनी दिवसा व रात्री उशिरापर्यंत भुरकवाडी, वाकेश्वर, वडूज याठिकाणी धाडी टाकल्या.

तर मध्यरात्री कळंबी येथे गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीचा अड्डा उलथून टाकला. भुरकवडीत अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर आढळून आल्याने जप्त केला गेला. वडूज हद्दीत दोन ठिकाणांहून सहा ब्रास वाळू साठा जप्त केला. वाकेश्वरला येरळा नदीपात्रात पाच फूट मातीचा थर उत्खनन करून त्याखालील ३५ ते ४० ब्रास वाळूची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले. कळंबी-येळीव रस्त्यालगत मध्यरात्री एक वाजता विहिरी शेजारील अवैध दगड वाहतूक करणारा जेसीबी ताब्यात घेतला. माण व खटाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वाळू व गौण खनिजाची तस्करी होत असल्याने तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होताना, त्यांनी खटाव तालुक्यातील सरसकट सर्व बेकायदा उत्खनन व धंदे उद्ध्वस्त करावेत, अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button