breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उत्तरप्रदेशातील सामुहिक अत्याचार व हत्याकांडाचा युवक कॉंग्रेसतर्फे जाहीर निषेध

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उत्तरप्रदेश येथील हाथरस तालुक्यातील बूलगाडी या गावामध्ये झालेल्या युवतीवरील सामुहिक अत्याचार व हत्याकांडाचा युवक कॉंग्रेसच्या वतीने सांगवी येथे निषेध करण्यात आला. स्व. वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ स्व. मनिषा वाल्मिकी या युवतीला मेणबत्ती प्रज्वलित करून श्रध्दाजंली वाहण्यात आली.

स्व. मनिषा वाल्मिकी या युवतीवर झालेल्या सामुहिक अत्याचार व हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकाराचा करावा तेवढा निषेध कमी आहे. एवढी भयानक घटना घडूनही पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशिलता समाजात चीड निर्माण करणारी आहे. यावरून उत्तरप्रदेशातील योगी सरकारचा खरा चेहरा समोर येतो व कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती यावरून स्पष्ट होते, अशी भावना युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केला आहे.

यापुर्वी सुध्दा अशा दलित अत्याचाराच्या व हत्याकांडाच्या घटना त्याठिकाणी घडल्या आहेत. वास्तविक पाहता या भयावह परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असलेले मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी देखील बनसोडे यांनी केली आहे. तसेच, याबाबत त्वरित पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करावे, या प्रकाराची न्यायलयीन प्रकिया जलदगती न्यायलयात करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने केली आहे. जर, त्वरित अंमलबजावणी करण्यात आली नाही तर अधिक तीव्रतेने जनआंदेलन करण्यात येईल, असा इशारा देखील बनसोडे यांनी दिला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे, गिरीधर माने, ओंकार पवार, श्रेयस बायत, ओम चौधरी, रोहित जगताप आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button