breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठरलं… जुलैमहिन्यात होणार मंत्रीमंडळाचा विस्तार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कुणाला संधी मिळणार? : आमदार महेश लांडगे, राहुल कुल, माधुरी मिसाळ यांच्या नावाची चर्चा

पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळाच्या रखडेल्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. जुलै-२०२३ मध्ये मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ४ जून रोजी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांसह मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा झाली होती. या काळात ‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’ आणि आषाढी वारी सोहळा सुरू असल्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच म्हणजे जुलै महिन्यात होणार आहे. यासह राज्यातील विविध प्रश्नांबाबत आम्ही केंद्रातील वरिष्ठांशी चर्चा केली आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील.

पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कुणाला संधी?

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल आणि पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघाच्या माधुरी मिसाळ यांच्यापैकी दोघांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1674669290921009154

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button