ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

Google Payची व्यवहार मर्यादा कमी आहे?

Google Pay या लोकप्रिय ऍपच्या दररोजच्या व्यवहारांवर मर्यादा असतात. बँकेव्यतिरिक्त Google Pay वर स्वतःचीदेखील मर्यादा आहे. ही मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला सहसा एक दिवस प्रतीक्षा करावी लागते आणि मग दुसऱ्या दिवशी व्यवहार करण्याची मर्यादा परत मिळते.

Google Pay वरून तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपये पाठवू शकता. तसेच एका दिवसात जास्तीत जास्त 10 व्यवहार करू शकता. याशिवाय तुम्ही एका दिवसात 2000 रुपयांपेक्षा जास्त मागणी करू शकत नाही.

ही मर्यादा तुम्हाला कमी पडत असेल, तर काळजी करू नका. तुम्ही ऑनलाईन लोकप्रिय ऍपपद्धत नेट बँकिंग किंवा एनईएफटी वापरू शकता किंवा Google Payच्या कस्टमर केअरला फोन करून UPI ​​मर्यादा वाढवण्याची विनंती करू शकता. Google Payच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ‘आणखी मदत हवी आहे?’ या पर्यायाखाली ‘आमच्याशी संपर्क साधा’ हा पर्याय निवडा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button