breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020 : मुंबई इंडियन्सचा केकेआरवर दणदणीत विजय

युएई – यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आपल्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत मिळवला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा पहिला विजय ठरलाच, मात्र युएईमधीलही त्यांचा हा पहिलाच विजय आहे. गेल्या सहा सामन्यांमध्ये मुंबईला युएईत एकही विजय मिळवता आला नव्हता. अखेर बुधवारी रोहित शर्माची धडाकेबाज ८० धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे त्यांना केकेआरवर विजय साकारता आला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

मुंबईकडून सुर्यकुमार यादव (४७) आणि रोहितने ५४ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार फटकावून केलेल्या ८० धावांच्या जोरावर मुंबईला २० षटकांत ५ बाद १९५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघ १४६ धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. कोलकाताला २० षटकांत ९ बाद १४६ धावा करता आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button