breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus:सातारा जिल्ह्यात बारा तासात 58 नवे कोरोनाग्रस्त

सातारा : सातारा जिल्ह्यात तब्बल 52 जणांच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल आज सकाळी (27 मे) पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक वाढली आहे. तर दोघा कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. गेल्या बारा तासात सापडलेल्या नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या 12 तासात एकूण 58 रुग्ण वाढल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 394 झाली आहे.

काल रात्री नऊ वाजता 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यामध्ये एक रुग्ण ‘सारी’ या आजारानेही त्रस्त होता. हे सर्व रुग्ण  कराड, पाटण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यानंतर आज सकाळी आणखी 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दरम्यान, वाई तालुक्यातील आसले येथील 67 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाच्या संसर्गाने प्राण गमवावे लागले. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या 255 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

राज्यात कालच्या दिवसात 2091 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 97 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे. काल 1168 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 954 इतकी झाली आहे. सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button