breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020: हिटमॅन रोहित शर्माला आज मोठा विक्रम करण्याची संधी

दुबई : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होत आहे. या लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा ला एक नवा विक्रम करण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनी पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत स्थान मिळवण्यासाठी रोहितला फक्त १० धावांची गरज आहे.

बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितने १० धावा केल्यास त्याच्या आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण होतील. याआधीच्या सामन्यात रोहित शर्माने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ८० धावांची खेळी केली होती.

आयपीएलमधील सर्वात जास्त धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने १७९ सामन्यात ५ हजार ४२७ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना आहे. त्याने १९३ सामन्यात ५ हजार ३६८ धावा केल्या आहेत. या वर्षी रैना खेळणार नसल्याने रोहितला दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.

रोहित शर्माने आयपीएलची सुरूवात २००८ साली डेक्कन चार्जर्सकडून केली होती. तो मीडल ऑर्डरला खेळत होता. पण नंतर सलामीसाठी संधी मिळाली. बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आहे.

पहिल्या स्थानावर महेंद्र सिंह धोनी असून त्याने १९० सामन्यात २१२ षटकार मारले आहेत. या यादीत ख्रिस गेल पहिल्या स्थानावर असून त्याने १२५ सामन्यात ३२६ षटकार मारले आहेत. तर एबी डिव्हिलियर्सने १५६ सामन्यात १२५ षटकार मारले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button