breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर सहज विजय

अबुधाबी – आयपीएलच्या १३व्या हंगामात मंगळवारी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने सहज विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील हैदराबादचा हा पहिलाच विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकांत ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसनच्या फटकेबाजीची साथ याच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६० पार मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीला १५ धावांनी पराभव स्विकारावा लागला.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार खेळ करत संघाला ७७ धावांची सलामी मिळवून दिली. मात्र दमदार फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक पाच धावांनी हुकले. त्याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. तर बेअरस्टोने ४८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार लगावत ५३ धावा केल्या. विल्यमसननेदेखील चांगली फलंदाजी केली. त्याने २६ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावा केल्या. तसेच आपला पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या अब्दुल समाद याने १ चौकार आणि १ षटकार ठोकत ७ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर याने शिखर धवनच्या साथीने डाव सावरला. परंतु अय्यर १७ धावांवर बाद झाला. मग ऋषभ पंतने धवनला साथ दिली. मात्र धवनदेखील फटकेबाजी करताना ३४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने फटकेबाजीचा प्रयत्न केला परंतु तो १२ चेंडूत २ षटकारांसह २१ धावा काढून बाद झाला. त्यापाठोपाठ पंत २८ धावांवर बाद झाला. मग सामना दिल्लीच्या हातातून निसटला आणि अखेर हैदराबादने दिल्लीवर १५ धावांनी विजय मिळवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button