breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप-शिवसेनेचं सरकार येऊ नये, हेच आमचे ध्येय, म्हणून तडजोड – अजित पवार

  • राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवारांना जाहीर केला अधिकृत पाठिंबा
  • पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर केली टिका

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहराच्या विकासासाठी आणि बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी तडजोड केली आहे. भाजप-शिवसेनेचं सरकार येऊ नये, हेच आपलं ध्येय आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची भूमिका आज पिंपरीतील आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

अजित पवार म्हणाले की, भाजप निवडणुकीच्या प्रचारात 370 चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. वास्तवीक 370 मुद्दा देशपातळीवरचा आहे. तो उपस्थित करून राज्यातील 16 हजार शेतक-यांनी आत्महत्या का केली, याचं उत्तर मिळत नाही. बेरोजगारी, महागाई, ढासळणारा कायदा व सुव्यवस्था याची उत्तरे 370 मधून मिळतात का? नाही. त्यामुळे पाच वर्षात काय केलं, या एकाच प्रश्नाचे उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावे, असे पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरणाची जलवाहिनी अजुनही रेंगाळली आहे. गेल्या पाच वर्षात हा प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळे संपूर्ण शहराला आजही पाणी मिळत नाही. महापालिकेत भ्रष्टाचार होत आहे. पुणे मेट्रोचं काम रेंगाळलं आहे. नागपूरची मेट्रो सुरू झाली. याठिकाणी नेतृत्व नसल्यामुळे विकास रखडला आहे. आमच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी जेएनएनयुआरएमचा फंड आणला. रस्ते, उड्डाण पुल, सबवे, दवाखाने, ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, शाळा बांधल्या. भाजप-शिवसेनेने पाच वर्षात काय केलं, हे त्यांनी सांगावं.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, योगेश बहल, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात 175 आमदार निवडूण आणणार – पवार

शहारातील काँग्रेस अध्यक्षांची जी भूमिका आहे, त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करू. आमच्यात कुठेही वाद नाही. शहराध्यक्षांनी भूमिका घेतली असेल तर त्यांच्याशीही चर्चा करायला सांगतो. तसेच, आघाडीचे 175 आमदार राज्यभरात निवडून येतील. पावनेदोनशे उमेदवार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असावी, याबाबत आघाडीच्या आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही पवार यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button