TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपराजकारणराष्ट्रिय

कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक यांची चौकशी

पुणे ः कोरेगाव भीमा प्रकरणात कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची २१ ते २५ जानेवारी दरम्यान आयोगासमोर चौकशी होणार आहे. यासोबतच हर्षाली पोतदार आणि शिवाजी पवार यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभ जवळील कोरेगाव भीमा येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादातून घोषणाबाजी आणि दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि मालमत्तेचे नुकसान झाले. दरम्यान, पुणे-अहमदनगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढूरोड, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी परिसरात अनेक वाहने आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली.

या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. याप्रकरणी चौकशी आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही समन्स बजावले होते. 2018 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button