breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सतेज पाटील, हसन मुश्रीफांना भिडणारे DYSP सुरज गुरव कोण ?

कोल्हापूर –  कोल्हापूर महापाैर निवडीमुळे महापालिकेसमोर पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. यावेळी नगरसेवक मतदानासाठी आल्यानंतर त्यांची गेटवर आेळखपत्र तपासणी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव करीत होते. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली आहे. 

महापौर निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे महापालिकेत आले. मात्र यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. मुश्रीफांनी डीवायएसपी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र, या धमकीला न घाबरता गुरव यांनी, ‘ साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, गडचिरोलीच काय घरी पण जाईन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,’ अशा शब्दात प्रतिआव्हान दिले.

कोण आहेत सुरज गुरव?

उपअधीक्षक सुरज गुरव यांचा परिचय

सुरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे रहिवासी आहेत

सुरज गुरव 2013 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले.

नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं.

त्यानंतर त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली

त्यानंतर सुरज गुरव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून  रुजू झाले.

शाहूवाडीनंतर ते सध्या करवीर पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत

सध्या कोल्हापूर शहर प्रभारी उपअधीक्षक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button