breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रेरणा’दायी : आमदार महेश लांडगे यांनी मदत केलेल्या ‘त्या’ मुलीचे भाग्य उजळले!

अनाथ असलेल्या ‘प्रेरणा’चे पालकत्व विदेशातील दांम्पत्याने स्वीकारले

विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या वाढदिनी दिलेला ‘बेटी बचाओ…’ चा संदेश अखेर सार्थ ठरला
पिंपरी । प्रतिनिधी
सुमारे दोन वर्षांपूर्वी सामाजिक कारणास्तव एका मातेने त्यागपत्र देवून बालकल्याण समितीमार्फत ‘आधार’ संस्थेला दिलेल्या चिमुकलीला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती. त्यावेळी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल झालेल्या या मुलीला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मदत केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना चिमुकलीचा प्राण वाचेल की नाही, अशी चिंता होती. मात्र, दैव बलवत्तर म्हणून आज ‘प्रेरणा’ सदृढ जीवन जगत आहे. विशेष म्हणजे, या चिमुकलीला आता विदेशी दांम्पत्याने दत्तकही घेतले आहे. त्यामुळे ‘प्रेरणा’चे भाग्य उजळले, अशी भावना आधार ॲडॉपशन सेंटरच्या संचालिका माधवी भिडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
अडीच वर्षांपूर्वी (दि.२२ जुलै २०१९) राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता आमदार महेश लांडगे यांनी अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली होती. त्यावेळी एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. १५ ते २० दिवसांचे एक अनाथ बाळ चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. अत्यंत दुर्मिळ असलेला carnitine deficiency हा आजार संबंधित मुलीला झाल्याचे सांगण्यात येत हेाते. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी यांनी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात त्यावेळी उपचार घेत असलेल्या मुलीला एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. यासह समाजातील अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले होते.
दरम्यान, आता ती प्रेरणा दोन वर्षांची झाली आहे. विदेशातील एका दांम्पत्याने प्रेरणाला दत्तक घेतले आहे. त्यामुळे तीच्या आयुष्याला दिशा मिळाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सेजल जोशी म्हणाल्या की, अनाथ सापडलेल्या ‘प्रेरणा’ला त्यावेळी वैद्यकीय उपचारांची गरज होती. त्यावेळी सर्व क्षेत्रातून मदत मिळाली. भारतीय लोकांची मानसिकता आजही अनाथ आणि एखाद्या आजारामुळे त्रस्त असलेली मुलगी दत्तक घेण्याची नाही. पण, अमेरिका आणि विदेशातील लोकांना भारतीय संस्कृतीचे आकर्षण आहे. येथील मुलांना दत्तक घेण्यास अमेरिकन नागरिक प्राधान्य देताना दिसतात. अमेरिका येथील युताह या शहरात राहणाऱ्या रॉबर्ट आणि जॉर्डन या दांम्पत्याने ‘प्रेरणा’ला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना आणि लॉकडाउनमुळे कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी विलंब झाला. मात्र, आता प्रेरणाचे मेडिकल चेकअप झाले आहे. ती वैद्यकीय दृष्टया सदृढ आहे आणि अन्य कायदेशीर बाबींची पुर्तता झाली आहे. पुढील आठवड्याभरात प्रेरणा विमानाने युएसएला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे, ज्या दांम्पत्याने प्रेरणाला दत्तक घेतले आहे. त्यांना तीन मुल आहेत. तरीही त्यांनी प्रेरणाला दत्तक घेतले आहे. याचे विशेष कौतूक वाटते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button