TOP Newsताज्या घडामोडीपुणे

छत्रपती शिवाजी महाराज बदनामी प्रकरणी श्री श्री रविशंकर यांची चौकशी

  • पुणे सत्र न्यायालयाचे आदेश : संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांची माहिती

पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपल्या फेसबुक पेजवरुन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्या प्रकरणी पुणे कोर्टाने वाकड पोलिसांना सदरील प्रकाराचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी कोर्टात धाव घेतली होती.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या फेसबुक तथा युट्युब पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखविण्यात आलेले होते. कोर्टात चाललेल्या एका अहमदनगरमधील केसच्या निकालात कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. याचा दाखला देत संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी सदरील वादग्रस्त व्हिडिओ तात्काळ हटवून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे तब्बल दोन वर्षांपासून पाठपुरावा चालू ठेवला.


यासंदर्भात काळे यांनी वाकड पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. तसेच, काळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी कायदेशीर मार्गाने आंदोलने केली होती. यामध्ये रस्ता रोको, धरणे आंदोलन, मुंडन आंदोलन, श्राद्ध आंदोलन, ठिय्या आंदोलन तसेच उपोषणे केली आहेत. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना समक्ष भेट घेत त्यांचेकडे सतिश काळे यांनी तक्रार केली होती. तरी देखील यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुणे सत्र न्यायालयात दाद मागितली होती.
वाकड पोलिसांना न्यायालयाचे आदेश…
दरम्यान, सतिश काळे यांचे म्हणणे ऐकून घेत तसेच सर्व पुरावे लक्षात घेऊन मा. न्यायाधीश एस. व्ही. निमसे यांनी दि. ७ जुलै २०२२ रोजी वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम २०२ अंतर्गत तपास करुन तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. सतिश काळे यांच्या वतीने ॲड. तोसिफ शेख, ॲड. क्रांती सहाणे, अ‍ॅड. दीपक गायकवाड, अ‍ॅड. स्वप्नील गिरमे, ॲड. मोहम्मद शेख, अ‍ॅड. महेश गवळी, अ‍ॅड. शिवानी गायकवाड,अ‍ॅड. नुपूर अरगडे, अ‍ॅड. राम लोणारे पाटील यांनी काम पाहिले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button