breaking-newsक्रिडा

Indonesia President Cup – एकतर्फी सामन्यात मेरी कोमची बाजी, पटकावलं सुवर्णपदक

इंडोनेशियातील लाबुआन भागात सुरु असलेल्या मानाच्या President Cup स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा ५-० च्या फरकाने पराभव केला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता, मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती.

मात्र २१ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कोमने President Cupस्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button