क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंडियन सुपर लीग फुटबॉल : हैदराबादला पहिल्यांदा ‘आयएसएल’चे विजेतेपद

हैदराबाद एफसी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये केरळ ब्लास्टर्सचा ३-१ पराभव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद मिळवले.

पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीने तीन पेनल्टीचा बचाव करत हैदराबादच्या जेतेपदामध्ये निर्णायक भूमिका पार पाडली. त्यापूर्वी निर्धारित आणि भरपाई वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. शूटआऊटमध्ये हैदराबाद संघाकडून जोओ व्हिक्टर, खासा कामरा आणि हालीचरण नरझारे यांनी गोल मारले. केरळ ब्लास्टर्सकडून एकमेव गोल आयुष अधिकारीने मारला. कट्टीमनी हा हैदराबाद संघाच्या जेतेपदाचा नायक ठरला. त्याने शूटआऊटमध्ये मार्क लेस्कोव्हिच, निशू कुमार आणि जिकसन सिंगच्या पेनल्टी रोखल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button