ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्षाचे उदघाटन

पिंपरी चिंचवड | हिंजवडी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्षाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथके) संजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, आनंद भोईटे, मंचक इप्पर, सतद्रू सिन्हा, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक कॅरोलिन ओडवा दि वॉल्टर, रफिक नदाफ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आदी उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी बोलताना अपर पोलीस महासंचालक संजय कुमार म्हणाले, बालस्नेही पोलीस स्टेशन ही संकल्पना पोलीस ठाण्याच्या आवारात असायला नको. ती पोलीस ठाण्यापासून वेगळ्या ठिकाणी असावी. त्यामुळे मुलांवर पोलीस ठाण्यातील कोणत्याही वातावरणाचा प्रभाव पडणार नाही.

पोलिसांकडून नागरिकांच्या अपेक्षा खूप असतात. कधीकधी या अपेक्षा पोलिसांनाच कन्फ्युज करतात. पोलिसांकडे येणा-या 98 टक्के तक्रारी अदखलपात्र असतात. नागरिकांनी सामंजस्याने वागायला हवे, असेही संजय कुमार म्हणाले.

बालकांच्या संदर्भातील सर्व प्रकारचे गुन्हे आणि पोलीस ठाण्यातील प्रक्रिया बालस्नेही पद्धतीने करण्यासाठी तसेच बालकांवर पोलीस ठाण्याच्या कोणत्याही कार्य पद्धतीचा दबाव येऊ नये यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिला बालस्नेही पोलीस कक्ष निगडी पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आला. बालकांचे हक्क आणि त्यांच्या समस्यांबाबत काम करण्यासाठी बालस्नेही पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे वातावरण बालस्नेही करणे, भरकटलेल्या बालकांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा कक्ष प्रयत्न करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button