Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

धुळे जिल्ह्यात दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडले

धुळे : जिल्ह्यात आज दोन विविध एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न झाला असून फागणे येथे धुळे तालुका पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. मात्र, कापडणे येथे गॅस कटरच्या मदतीने चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून पाच लाख रुपयांपेक्षा जास्तीची रोख रक्कम चोरी केल्याचं समोर आलं आहे.

धुळे जिल्ह्यातील फागणे येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, धुळे तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ पोहोचल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला यामुळे दरोडेखोरांना चोरी करणे या ठिकाणी शक्य झाले नाही. परंतु सोनगीर जवळील कापडणे गावातील मुख्य चौकात असलेल्या इंडिकॅश टाटा प्रोटेक्टचे एटीएम मशीन फोडून पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.कापडणे येथे दरोडेखोरांनी अनोखी शक्कल लढवून या एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही कॅमेरा ला स्प्रे मारल्यानंतर चोरी केल्याचे निदर्शनास आलं आहे. घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले आहे. त्यामुळे हे दोन्ही एटीएम एकाच टोळीने फोडण्याचा संशय पोलिसांना आहे. सदर एटीएमच्या परिसरात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून लवकरच एटीएम फोडणारी टोळी गजाआड होईल असा विश्वास पोलिसांना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button