breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यास लाथा बुक्यांनी बेदम मारहाण

पुणे : एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबरदस्त मारहाण केली आहे. लाथाबुक्यांनी ही मारहाण केली आहे. वर्गात दंगा करत असल्याचे पाहून ही मारहाण झाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम’ हे दिवस जाऊन आता शाळेत हसत-खेळत शिक्षण प्रणाली आहे. परंतु त्यानंतर काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. आता शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना महिन्यापूर्वी घडली आहे. परंतु त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

पुण्यातील एका नामवंत शाळेत ही घटना घडली आहे. या संदर्भात मुलाच्या पालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा शिकत असलेल्या शाळेतील एक शिक्षक रजेवर होते. त्या शिक्षकांच्या जागी पूजा केदारी या शिक्षिका वर्गात आल्या. त्यावेळी काही मुले घोळका करुन बसले होते. शिक्षक आल्यावर सर्व मुले जागेवर जाऊन बसले.

हेही वाचा – चिखले ग्रामस्थांचा खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा

परंतु पूजा केदारी यांना राग आला. त्यांनी तक्रारदार पालकाच्या मुलास मारहाण सुरु केली. अगदी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. मागील महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यावेळी मुलाने हा प्रकार सांगितला नाही. परंतु मुलास मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तो माझ्या पाहण्यात आला. त्यानंतर मुलाकडे विचारणा केली असता त्याने सविस्तर प्रकार सांगितला, असे पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पूजा केदारी यांनी यापूर्वी मुलांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button