breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कस्पटे वस्ती मध्ये नागरिकांना थेट शेतकरी ते ग्राहक ‘भाजी-पाला’

  • युवा नेते गणेश कस्पटे यांच्या आठवडी शेतकरी बाजाराचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी – आयटी हबच्या लगत असणाऱ्या आणि उच्च शिक्षीत राहत असलेल्या वाकड मधील कस्पटे वस्ती परिसरात यापुढे नागरिकांना भाजी पाला, फळे व अन्य वस्तू थेट शेतकऱ्यांकडून मिळणार आहेत. युवा नेते गणेश कस्पटे यांच्या संकल्पनेतून आठवडी शेतकरी बाजाराचे नियोजन करण्यात आले आहे. याचे उदघाटन चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, विनायक गायकवाड, आरती चोंधे, संकेत चोंधे ,नितीन इंगवले , गणेश कस्पटे, रामहारी कस्पटे, जगन्नाथ कस्पटे, सिंकंदर कस्पटे, नामदेव कस्पटे, लहु कस्पटे, रामदास कस्पटे ,मोहन कस्पटे, सचिन कस्पटे, अनिल कस्पटे, सुधिर कस्पटे, बाळासाहेब जाधव, सिताराम कस्पटे, नेताजी कस्पटे, सुहास कस्पटे विशाल मानकर, विशाल कस्पटे, श्रीनिवास मानकर, जिवन कस्पटे, सुहास आढाव, विकास कस्पटे, प्रेमराज मानकर यांसह मोठ्या प्रमाणात महीला वर्ग, कार्यकर्ते परिसरातील जेष्ठ नागरीक व सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते.

आयटी वर्ग राहत असलेल्या वाकड, कस्पटे वस्ती परिरातील नागरिकांना स्वच्छ आणि ताजी भाजी ही गरज आहे. नागरिकांची ही गरज ओळखून गणेश कस्पटे यांनी ही संकल्पना राबवली आहे. याचा फायदा येथील नागरिकांना होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा खूपच होणार आहे. गणेश कस्पटे हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात, याही पुढे ते असेच काम करतील असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button