breaking-newsआंतरराष्टीय

IMF पेक्षा पाकिस्तानवर चीनचं अधिक कर्ज

कायमच पाकिस्तान चीनला आपला मित्र म्हणत आला आहे. परंतु पाकिस्तान चीनच्याच कर्जात बुडाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आएएमएफने दिलेल्या कर्जापेक्षाही चीनकडून पाकिस्तानने दुप्पट कर्ज घेतलं आहे. सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक संकट उभं असून त्यांच्यावर असलेला चीनचा कर्जाचा बोजाही दिवसागणिक वाढत चालला आहे. तसंच त्यांच्यावरील परकीय चलनाचंही संकट वाढलं आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आयएमएफने 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहे. सध्या पाकिस्तावर असलेल्या इतर कर्जापोटी त्यांना 2.8 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आपला मित्र चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे. त्यामुळे पाकिस्तावरील संकटात वाढ झाली आहे. तर आयएमएफने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला 2022 पर्यंत चीनकडून घेतलेल्या 6.7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button